दोंडाईच्याचा डॉक्टर
लेखक – डॉ.रवींद्रनाथ टोणगावकर
पुस्तक परिचय –
दोंदाईचा सारख्या ग्रामीण भागात चाळीस वर्ष शल्यचिकित्सक म्हणून म्हणून काम करणाऱ्या एका तत्वनिष्ठ डॉक्टरांचा हा प्रवास….
कठोर मेहनत आणि प्रयत्नांतून डॉक्टरांनी वैद्यकीय परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आणि शल्यचिकित्सक म्हणून दोंदाईचे सारख्या ग्रामीण भागात अनेक अडथळे, अडचणींवर मात नावलौकिक मिळवला.
वैद्यकीय क्षेत्रातल्या बुध्छिप्रमावर भर देऊन डॉक्टरांनी अध्यात्माचाही शोध घेत गीता उपनिषदे यांपासून शस्त्रक्रिया पर्यंत अनेक विषयांवर व्याख्याने दिली आणि ग्रामीण भागातल्या अंधश्रद्धांना दूर करण्याचा प्रयत्न करत शास्त्रीय तत्वांवर विश्वास ठेऊन जगण्याचा मार्ग दाखवला.
डॉ. टोणगावकर यांनी हर्नीया ऑपरेशन साठी आयात केलेल्या जाळीच्या कापडा संदर्भात बारा वर्षे संशोधन केले.ऑपरेशन साठी आयात केलेल्या जाळीची किंमत दीड हजार ते दहा हजार रुपये इतकी होती.ह्या संशोधनातून वापरण्यात येणाऱ्या जाळीची किंमत फक्त पन्नास पैशांपासून दोन रुपये इतकी झाल्याने,अर्थातच रुग्णांकडून जाळीची कुठलीही किंमत घेतली जात नाही.
त्यांच्या या संशोधनाची कतार मधील दोहा इथल्या जागतिक परिषदेत प्रथम क्रमांकाने निवड झाली.आज जगभरातील अठठाविस देशात या स्वस्त जाळीचा वापर होत असल्याने ऑपरेशन चा खर्च सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात येत आहे.
श्रीमद्भगवद्गीता
श्रीमद्भागवद्गीता म्हणजे महाभारताच्या भिष्मपर्वामध्ये आलेला श्रीकृष्णार्जुन यांचा संवाद, परंतु या १८ अध्यायाच्या श्रीकृष्ण संवादाला वैश्विक तत्वज्ञानाचा पाया संबोधले जाते. वेदाचे सार महाभारतात आहे, तर महाभारताचे सर्व सार १८ अध्यायाच्या भगवद्गीतेमध्ये आले आहे.भगवद्गीतेमध्ये दोन संवाद आले आहेत, राजा धृतराष्ट्र आणि संजय, भगवान श्रीकृष्ण आणिअर्जुन.परंतु धृतराष्ट्राचे बोलणे मात्र एकदाच आले आहे,त्याने प्रथमाध्यायामध्ये आपला मंत्री संजयाला प्रश्न विचारला आहे. त्यानंतर संजयाच्या बोलण्या अंतर्गत श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आला आहे.
धृतराष्ट्रपुत्र कौरव आणि पांडुपुत्र पांडव युध्दभुमीत एकत्र जमल्यानंतर,अर्जुनाच्याच सांगण्यावरून श्रीकृष्णाने आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केला, कौरव सेने मध्ये पांडवसेनेविरुध्द लढण्यासाठी आलेले गुरुजन,गोत्रज,आप्तेष्ट पाहून अर्जुनाच्या हातातील धनुष्य गळून पडला आणि अर्जुन मोहाने व्याकुळ झाला, त्याच्यातली विरवृत्ती नाहीशी होवुन करुणावृत्तीने त्यामध्ये प्रवेश केला. त्यावेळी कर्तव्य विसरुन मोहाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाला युध्दासाठी प्रवृत्त करण्यासाठी श्रीभगवंताने गीताशास्त्र प्रतिपादन केले. ज्यामध्ये कर्म ज्ञान आणि उपासना असे तिन विभाग आले आहेत. जन्माला आल्यापासुन तर मृत्युपर्यंत जगावे लागते ज्याला आपण जीवन म्हणतो. मग मरे पर्यंत कसे जगावे हे भगवद्गीता शिकवते.