प्रबोधमार्तंड पुरस्कार 2024 ह.भ.प.श्री.विश्वनाथ महाराज वारींगे

श्रीएकनाथषष्ठीचे औचित्यसाधित यंदाच्या वर्षीपासुन पैठण येथेशांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशनच्या वतीने वारकरी संप्रदायातील विविध सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

।। प्रासादिक वचन ।।

 श्री.विश्वनाथजी वारींगे महाराज यांच्या प्रवचनातून टिपलेले प्रासादिक वचन

आयुष्याचे सोने करा !

ज्याला जीवनाचे महत्व कळले त्याच्या जगण्यात अर्थ असतो,ज्याला जीवनाचं महत्त्वच नाही कळले त्याचे जगणे निरर्थक असते,म्हणजेचअर्थशून्य जगणे,
बऱ्याच लोकांच्या जगण्याचीअक्षरशः कीव येते,आणि वाटते की याला माणसाचा जन्म का मिळाला असावा?
आपण आज या संबंधाने चर्चा करणार आहोत, माणसाला जेव्हा मी माणूस आहे याचा विसर पडतो त्यावेळी तो पशु समान जीवन जगायला सुरुवात करतो,तो पाशवी कृत्य करतो,
कधी कधी पशु देखील जे कृत्य करण्यास धजावत नाही, असे भयानक कृत्य माणसे करतात.
आपण दररोज वर्तमान पत्र,टीव्ही वर बातम्यामध्ये या बाबत ऐकत असतो,
संपत्ती साठी कधी पिता पुत्राचा खून, तर कधी भावकडून भावाचा खून, कधी एकाच कुटुंबातील सर्वांची च हत्या, घरे जाळणे,मुले मारणे,बलात्कार,अत्याचार,अनाचार, भ्रष्ट्राचार, अंगावर शहारा यावा अशा भयानक घटना, माणसाकडून घडतात याची खरोखर कीव येते.
सृष्टीतील सर्व प्राण्यांमध्ये एक माणूसच प्राणी असा आहे की ज्याच्या ठिकाणी सद्सद्विवेक बुद्धी आहे, अन्य प्राण्यांच्या ठिकाणी विषयभोगाचे प्राबल्य अधिक आहे,पण आत्मज्ञानाचा अभाव आहे,त्यांच्या ठिकाणी पाप-पुण्य, सत्य-असत्य, याचे यत्किंचितही ज्ञान नाही. तरी देखील जितके क्रुर पशु नसतात त्याहून अधिक क्रूर कृत्य माणसे करतात,
म्हणून आपण आमच्या अनेक कार्यक्रमातून एक वाक्य ऐकले असेल, ‘की लोक म्हणतात संत व्हा,देव व्हा !, पण मी म्हणतो संत होणे,देव होणे तितके सोपे नाही,म्हणून माणूस व्हा,आणि माणसासारखे वागा,
एकदा माणसाला माणूस पणाची जाणीव झाली की मग कर्मात बदल होतो,कर्मात सरळपणा आला की संता समान जीवन जगायला सुरुवात होते, संता सारखे जीवन जगताना मग एकदिवस माणसातच देवत्व येते,
संत कबीर जी म्हणतात ‘ पशु का होत पन्हय्या,नर का कछउ नही होय । नर कुछ करनी करे तो नर का,नारायण होय ।।
इतिहासाने ज्यांचे पोवाडे गायले ती ही माणसेच होती, फक्त त्यांनी एक विचार केला, या देहाची एक ना एक दिवस राख होणारच आहे,मग त्याची माती का करायची, करायचेच असेल तर या देहाचे सोने करू,या विचाराने ती माणसे जगात नसूनही अजरामर झाली.

 श्री.विश्वनाथजी वारींगे महाराज यांच्या प्रवचनातून टिपलेले प्रासादिक वचन

प्रत्येक मनुष्य शरीरधारी जीवाने जीवनात विचार करणे अत्यावश्यक आहे,अविचाराने मनुष्य जीवनाचे पतन होते,सुविचाराने मनुष्य जीवनाचा विकास होतो, संत वाक्य असे आहे की ” विचारा वाचुन । न पवेची समाधान ।।” विचार जरी सर्वच जण करीत असले तरी सद्विचार करून कृतार्थ होणारे लोक क्वचित पाहावयास मिळतात. ज्या विचाराने जीवनाचा उत्कर्ष होईल असे महत्वपुर्णविचार आम्ही सदर लेखामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मनुष्याने नेहमी विचार करावा, संसारात नेमके आपले काय आहे ? या संसाराचा आपला संबध नेमका कशामुळे आला ? जगात परमात्मा नावाची जी वस्तु आहे ज्याचे वर्णन वेद पुराण तसेच सर्व संतानी केले आहे त्याची मला अनुभुती येईल का ? मी कोण आहे, जन्मापुर्वी मी नव्हतो जन्मानंतर मी नसेनमगमी आलो कुठून ? मला जायचे कुठे आहे ? या सर्व गोष्टीचा सार विचार प्रत्येक मनुष्याने जीवनात करावा.

महत्वाचे चिंतन : प्रतिक्षण ज्यात बदल होता तो संसार जो कधीच बदलत नाही तो परमात्मा,प्रपंचात कीतीही सायास केले तरी प्रतिक्षण प्रपंच आपल्या पासुन दुरावत जातो, पण परमात्म्याच्या संबंधाने केलेल्या सायासाने परमात्मा प्रतिक्षण आपल्या जवळ येतो.नाहीसे होणारे नश्वर पदार्थ आम्हाला आपलेसे वाटतात,परंतू अविनाशी परमात्मा आंम्हाला कधीच आपला वाटत नाही.जो सतत आपल्या सोबत आहे,आपण जरी त्याला विसरलो तरी तो आपल्याला कधीच विसरत नाही.एक अश्चर्य नाही का? ज्या शरीरावर आपण मनसोक्त प्रेम करतो ते शरीर आमची यत्कींचीत पर्वा करीत नाही.रात्री झोपल्यावर चुकून अंगावरील वस्त्र बाजुला झाले की थंडी वाजते,जेवणाला थोडा उशीर झाला की शरीर व्याकुळ होते, ज्याची नित्य सेवा करून ते शरीर आमच्या अपराधाची यत्कींचीत पर्वा करीत नाही कींवा विसरपणाची क्षमा करीत नाही ! तरी ही ते शरीर आपल्याला अतिशय प्रिय आहे.कींवा शरीर संबंधाने असणारे आपले संबधीत जे आपल्याला आपले वाटतात.परतूशरीरशक्तीहीन झाल्यावर अथवा आपल्या पासुन त्यांना इच्छित लाभ न झाल्याने ते आपला त्याग करतात, ज्यांच्यासाठी आपण पापाचे डोंगर माथ्यावर करून त्यांची सेवा केली,तेही आपल्याला शेवटी उपयोगात येते नाही .परंतू तरीही त्यांच्यावरचे आपले प्रेम कमी होत नाही.पण आमचे सर्व अपराध क्षमा करुन आमची नित्य चिंता वाहणारा श्रीभगवाना आम्हाला प्रिय वाटत नाही कीवा आपल्या हीताचा विचार करणारे महात्मे आपल्या कधी आपले वाटत नाही.हे आश्चर्य नाही तर काय ? ससारामध्ये आपल्या बरोबर असणारा प्रत्येक पदार्थ हा नश्वर आहे.मुळात हे पदार्थ ज्यावर अधारलेले आहेत त्याचे अधिष्ठानच जर मायावी आहे तर ते सर्वपदार्थ-वस्तु नश्वर आहेत यात काय संशय?
वास्तविक आपण त्या भगवंताचे अशं आहोत ” सिध्द करते.परंतू ज्याचे अंश आहोत तो परमप्रियत्तम आपल्याला प्रिय वाटत नाही.श्रीभगवान हे उपाधी रहीत आहेत,मलरहीत आहेत
” चेतन अमल सहज सुखराशी’ (‘रामचरित मानस.) कींवा तुकोबाराय म्हणतात, “ उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार । काहीच संसार तुम्हा नाही ।।” म्हणेज आपण त्या उपाधीरहीत मलरहीत परमात्म्याचे अंश असल्यामुळे आपण उपाधीरहीत आहोत,मलरहीत आहोत परंतू संसाराचा संग केल्यामुळे उपाधी ही आली आणि मल दोषादिकांची बाधा सहज झाली.संसारात लाभ तर काहीच नाही परंतू नुकसान होण्याचे काही बाकी राहत नाही.
संसारात आपल्याला एक अनुभव आहे,भजन कीर्तनाने आपले संबधीत पत्नी पुत्रादी खुश होत नाही,परंतू कपट,बेईमानी,पाप करून तुम्ही पैसा मिळवा त्यांना सुखी ठेवा ते खुश होतील म्हणून एक भजन प्रसिध्द आहे.

“संसार साथी सब स्वार्थ के है । पक्के विरोधी परमार्थ के है।

देगा न कोई दुख मे सहारा । सुनु तू किसी कीमंत बात प्यारा ।।
आपल्या हातून पाप होते की पुण्य ज्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही ते आपले शत्रु आहेत की मित्र याचा विचार प्रतिक्षण करावा.आपल्या सुखासाठी हे लोक आपल्यावर प्रेम करीत नसुन त्यांच्या सुखासाठी प्रेम करतात याची जाणीव आपल्याला शेवटी होते.देवाने सर्व दिले. शरीर, इंद्रिय,बुध्दी,जीव पण हे सर्व देऊन तो कधी हक्क गाजवित नाही हे आपल्याला का नाही कळत?
देवाने दिलेले शरीर ,इंद्रिय प्रिय वाटतात पण देव प्रिय वाटत नाही.त्याला काही नको, केवळ स्मरणाने तो जीवाला संसार दुःखातुन मुक्त करतो ” यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबंन्धनातीवमुच्यते ” (श्रीमद्भगवद्गीता.)

परमात्म्याशिवाय जीवन अपुर्ण आहे.परमात्मा साक्षत्काराने ते पुर्ण होते,अज्ञानी जीवाची धारणा असते पुत्र प्राप्तीने जीवन पुर्ण होते,काही म्हणतात शिष्य परिवार मिळाला की जीवन पुर्ण होते पण आपल्या पुढे उदाहरण आहे.संत मीराबाईचे ना पुत्र ना शिष्य पण जीवन पुर्ण झाले ” नाम नाम बिनूना रहे । सुनो सयाने लोय । मीरा सुत जायो नही । शिष्य न मुंडयो म्हणून अनित्य संसारावरचे प्रेम काढून त्या प्रेमाचा विषय श्रीपरमात्मा करण्याची प्रवृत्ती निर्माण होणे यास सद्विचार म्हणावा.

।। काव्यरंग ।।

थेंब

थेंब

कोणास ठाऊक म्हणावेअस्तित्व त्या थेंबाचेढगांवरती स्वार त्याबागडणा-या जलाचे ।।१।। कोसळतांना त्यालाभय का न वाटावेखा-या पाण्यावर जाऊनअस्तित्व त्याचे का मिटावे ? ।।२॥ चातक पक्षालाहीउत्तर कसे मिळावे?एकाच थेंबात त्यानेतृप्त कसे व्हावे ? ।।३।। काळयाशार मातीनेहीस्वप्नात का...

read more
गुरु प्रथम ती प्रेमळ

गुरु प्रथम ती प्रेमळ

गुरु प्रथम ती प्रेमळ, आयुष्यास देती आकार । इतरांहुनी नऊ माह अधिक,माझी तु जाणकार ।।१।। यशाचा तु सुर्यप्रकाश,वृक्षाची गार सावली । मायेचा अखंड पाझर,अशी माझी तु माऊली ।।२।। अन्नपुर्णा महालक्ष्मी,तुच दुर्गा महाकाली । तुझ्यावाचुन कोण सांग,माझ्या दुःखाचा वाली ।।३।। प्रथम...

read more
शहीद

शहीद

जगत होतो वेगळ्याच स्वप्नात , स्वप्नात होती बायको , दोन पोर अणि हसणारे एक घर || १ ||  पहात  होतो ते स्वप्न माझ्या उघड्या डोळ्यांनी,आणि माझ्या आयुष्यातीलआठवणीतल्या  सोहळ्यांनी || २ ||  बायको सुंदर नटली होती जणू अप्सराच वाटली होती आठवताना तिचे हसु लपवत होतो असवे तिच्या...

read more

।। दैनंदिन नित्यकर्म ।।

संपूर्ण हरिपाठ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण आरती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीपांडुरंगाष्टक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीपांडुरंगाष्टक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राम रक्षा स्तोत्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीहनुमान चालीसा वाचण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमधुराष्टकम् वाचण्यासाठी येथे क्लिक करा

।। आनंदीक्षण ।।

विश्व स्वधर्म सूर्यें पाहो