।। दैनंदिन नित्यकर्म ।।

आपल्या जीवनातील नित्यकर्म नेमके काय ? कसे करावे? याची सविस्तर माहीती या नित्यकर्म सदरामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक मनुष्याने विधीयुक्त दैनंदिन कर्म करावे. नित्यनेम करावा,मनुष्य जन्म प्राप्त होऊन जर नित्यनेम नसेल तर त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही.” काही नित्यनेमाविन । अन्न खाय तो श्वान । वाया मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ।।” (तु.महा.) वैदिक धर्मामध्ये असलेली विधीयुक्त दैनंदिन कर्म पध्दती प्रत्येकाने करावी.कर्म विधीयुक्त नसतील तर त्याचे फळ पदरात पडत नाही,म्हणून विधीयुक्त आचारसंहीता खालील प्रमाणे असावी.

१) सकाळी सुर्योदयापुर्वी उठून प्रथम करदर्शन करावे. दोन्ही हात डोळयासमोर धरून ‘कराग्रे वसते लक्ष्मी : करमध्ये सरस्वती । करमुले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम् ।। हामंत्र म्हणून दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे.

२) पृथ्वी देवतेला म्हणजे जमीनीवर मस्तक ठेवून ” समुद्र वसने देवी,पर्वत स्तन मंडले। विष्णुपत्नी ! नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व में ।। हा मंत्र उच्चारण करून नमस्कार करावा.

३) जीवन रक्षणा करीता श्रीभगवान विष्णूचे स्मरण करावे,शेषशय्येवर विराजमान श्रीविष्णूचे रुप डोळयासमोर आणून “जले रक्षतु वराह : स्थले रक्षतु वामनः । अटव्यां नारसिंहस्य,सर्वतः पातु केशवाः ।। या मंत्राचे उच्चारण करावे. “

४) शौचादी कर्म आटोपुन स्नान करावे .स्नान करतांना पवित्र नद्यांचे स्मरण करुन पुढील मंत्र म्हणावे.” गांगंवारि मनोहारि मुरारिचरणच्युतम् । त्रिपुरारिशिरश्चारि पापहारि पुनातु माम् ।। गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मद सिंधु कावेरी जलेऽस्मिण सन्निधिंकुरु॥

स्नानानंतर ओंजळीत पाणी घेऊन पुढील मंत्र म्हणवा “मम आत्मनः कृत कायिक,वाचिक,मानसिक,सांसर्गिक सकल पाप क्षयार्थ प्रातः स्नानमहं करिष्ये ।।” आणि ओंजळीतील पाणी खाली सोडून संकल्प सोडावा.

५) स्नानानंतर देवपुजा करावी,आपली सर्वस्व चिंता वाहणारा श्रीभगवान परमात्मा उदार आहे,दयाळू आहे.त्याने शरीर दिले,ज्ञानेंद्रिय,कर्मेंद्रिय प्रदान केली,अविनाशी,शाश्वत असा जीव ज्या भगवंताने आपल्याला दान दिला त्याच्या ऋणानुबंधातुन मुक्त होता येत नाही परंतु कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता त्याचे नित्य अर्चन करावे,
देवपूजा करताना मन प्रसन्न असावे.,मनात काम क्रोधादी विकार नसावे,चित्ताची एकाग्रता असावी. प्रथम स्वतःला गंध लावावा.व पुढील मंत्र म्हणावा : ॐ स्वस्ति न इंद्रो वृध्दश्रवा ।। स्वस्ति नः पुषा विश्ववेदाः । स्वस्तिनस्ताक्षर्यो अरिष्टनेमिः। स्वास्ति नो बृहस्पतिर्दधातु 11

देवासमोरील दीवा पेटवावा..दीवा शुध्द तुपाचा असल्यास उत्तम.दीव्याने दीवा पेटवू नये.कारण दीव्याने दीवा पेटविल्यास दारिद्र्य येते.(दीपेन दीपं प्रज्वाल्य दरिद्रो भवति वै स्फुटम् ।। ) म्हणून तसे करू नये .दिव्याची ज्योत दक्षीणेकडे नसावी.तुपाचा दिवा देवतांच्या उजव्या बाजुस असावा.व तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजुस असावा.घंटा आपल्या डाव्या बाजूस असवी,उजव्या बाजूस शंख असावा.शंखात नेहमी पाणी असावे. पाणी घेण्यासाठी पळी असावी,पुजेच्या पाण्यात बोट बुडवू नये.गंध साहनेवर उगाळावा.देवतांना लावला जाणारा गंधशक्यतो चंदनमिश्रीत असावा.

आचमन : उजव्या हातावर पाणी घेऊन ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐमाधवाय नमः । असे दोन वेळा म्हणून आचमन करावे.
ॐ गोविंदाय नमः असे म्हणून पाणी ताम्हणांत सोडावे, नंतर हात जोडून देवाची प्रार्थना करावी.पुढील नावे घ्यावी.ॐ मधुसुदनाय नमः ॐत्रिविक्रमाय नमः । ॐ वामनाय नमः । ॐ श्रीधराय नमः । ॐ ऋषीकेशाय नमः । ॐ पद्मनाभाय नमः । ॐ दामोदराय नमः । ॐ संकर्षनाय नमः । ॐ वासुदेवाय नमः । ॐ प्रद्युम्नाय नमः । ॐ अनिरुध्दाय नमः । ॐ पुरुषोत्तमाय नमः । ॐ अधोक्षजाय नमः । ॐ नारसिंहाय नमः । ॐ अच्युताय नमः । ॐ जनार्दनाय नमः । ॐ उपेंद्राय नमः । ॐ हरये नमः । ॐ श्री कृष्णाय नमः । देवांना दोन्ही हातांनी नमस्कार करुन स्तुती करावी. ” त्वमादिदेवाः पुरुषः पुराण । त्वमस्य विश्वस्य परं निधानम्। वेत्तासि वेद्यं च परं च धाम । त्वया ततं विश्वमनंतरूप ।। ( याचा अर्थ असा आहे की ‘हे परमात्म्या पुराणपुरुषा तु या विश्वाचे परम निधान आहेस,तु सर्वाना जाणणारा,जाणावयाची वस्तु आणि परमपद आहेस,तु या समस्त विश्वाला व्यापले आहेस.) देवाची स्तुती झाल्यानंतर प्रार्थना करावी. ” ॐ नमस्ते देव देवेश तेजोराशे जगत्पते । क्रीयमाणां मया पुजां गृह्यण सुरसत्तम् ।।

प्रार्थना करून देवांची मुर्ती तांबणात घेऊन त्यांना पवित्र जलाने स्नान करावा त्यावेळी पुढील मंत्र म्हणावा : गंगा सरस्वति रेवा पयोष्णी नर्मदाजलै : । स्नापितोसि मया देव तथा कुरुष्व मे ।। स्नानीय समर्पयामी ।। एका स्वच्छ वस्त्रान देवाला पूसुन घ्यावे.आणि देवाला वस्त्र अर्पन करावे व पुढीलमंत्र म्हणावा
सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे । मयोपपादिते तुभ्यं वाससिप्रतिगृह्यताम् ।।

देवाला गंध लावावा उजव्या हाताच्या करंगळी जवळील बोटाने गंध लावावा.गंध लावतांना म्हणावयाचा मंत्र.

श्रीखंड चंदनं दिव्यंगंधाढयंसुमनोहरम् । विलेपनंसुरश्रेष्ठ चंदनप्रतिगृह्यताम् ।। गंध लावून झाल्या नंतर देवाला पुष्य म्हणजे फुले अर्पन करावी, फुले अर्पन करतांना पुढीलमंत्र म्हणावा

माल्यादीनि सुगंधीनिमाल्यत्यादीनि वैप्रभो।

मया हातानि पूजार्थपुष्पाणि प्रतिगृह्यताम् ।।

देवालाधूप ओवाळताना पुढीलमंत्र म्हणावा
वनस्पतिरसोद्भूतो गंधाढयो गंध उत्तमः । आप्रेयः सवदेवानांधूपोयंप्रतिगृह्यताम् ।।

तूपाचा दिवा उजव्या हातात घेऊन देवासमोर धरून पुढीलमंत्र म्हणावा:

साज्यंचवर्तिसंयुक्तं वन्हिवायोजितंमया।
दीपंगृह्यण देवेश त्रेलोक्यतिमिरापह ।।

देवाला फळे अथवा खडीसाखरेचा नैवैद्य अर्पण करावा.नैवैद्य अर्पण करताना देवासमोर चौकोनी पाण्याचे मंडल तयार करावे.म्हणजे पाण्याचा चौकोन काढावा.त्यावर नैवैद्याचे ताट,वाटी जे असेल ते ठेवावे.त्याभोवती पाणी फिरवून म्हणावे

“ॐ प्राणाय स्वाहा। ॐ अपानाय स्वाहा। ॐ व्यानाय स्वाहा। ॐ उदानाय स्वाहा।ॐसमानाय स्वाहा। असे म्हणून पुढीलमंत्र म्हणावा

नैवैद्यं गृह्यतां देव भक्तिंमे ह्यचलां कुरु। ईप्सितंमेवरं देहि परत्रे चपरांगतिम् ।।

शेवटी हात जोडून देवाला एकाग्रचित्ताने अंतःकरणपूर्वक श्रद्धेने प्रार्थना करावी.व पुढील मंत्र म्हणावा.
नास्तित्वमवशरणममात त्वमेव माता च पिता त्वमेव। त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव। त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वमम देवदेव।।
देवासमोर एक अभंग दररोज म्हणावा.

दुर्बुद्धी ते मना । कदा नुपजो नारायणा ।।१।। आता मज ऐसे करी । तुझे पाय चित्ती धरी ।।२।। उपजला भाव । तुमचे कृपे सिद्धि जावो ।।३।। तुका म्हणे आता । लाभ नाही या परता।।४।।

(“ॐ नमो भगवते वासुदेवाय “जप कमीत कमी १०८ वेळा करावा) नंतर पुढील मंत्र म्हणून तीर्थ घ्यावे.

अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशम् । विष्णुपादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहम् ।।

ॐ शांतीःशांतीःशांती

नंतर तुळशीला पाणी घालून प्रदक्षीणा कराव्या.गुरुस्मरण करावे,आईवडीलांना नमस्कार करावा.

६) देवपुजेनंतर आपले ठरलेले नियोजित कर्म करावे .आपल्यावर कुठलेही संकट येऊ नये याकरीता संकटनिवाराणार्थ खालील मंत्राचा जप करावा.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ।।

७) भोजन करतांनाही मन प्रसन्न असावे.भोजनास बसले असता बोलु नये,त्याचे कारण आपल्या तोंडातील अन्न कींवा धुंकी इतरांच्या ताटात उडते.पचनक्रीया नीट होत नाही,अन्नाचा अवमान होतो.

भोजन म्हणजे केवळ पोट भरणे नसुन ते एक यज्ञकर्म आहे.म्हणून जेवताना श्लोक म्हणावे.जेवताना म्हणावयाचा श्लोक खालीलप्रमाणे आहे.

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्।।
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरिचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे। जीवनकरी जीवीत्व अन्नहे पुर्णब्रह्म। उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म।।

सायंकाळी देवासमोर दिवा लावून प्रार्थना करावी
शत्रुबुद्धि विनाशाय दिपजोर्ती नमोस्तुते ।।
नित्यनेमाने देवासमोर हरिपाठ करावा. हे दैनंदिन कर्म प्रत्येक मनुष्याने करणेअवश्यक आहे.जसे आपण भोजन,झोप,व्यापार,उद्योगास महत्त्व देतो तसेच दैनंदिन नित्य उपासनेला अर्थात संध्या स्नानादी कर्माला विशेष महत्व द्यावे.