।। विचारधारा ।।
- रोग आणि अज्ञान लपवले की वाढतात. म्हणून वैद्यासमोर रोग आणि गुरु समोर अज्ञान प्रगट करावे.
- मन म्हणजे स्वतःचे गुण दोष दाखवणारा एक स्वच्छ आरसा आहे. जन्मानंतर बोलता यायला कीमान दोन वर्ष लागतात, पण कसे बोलावे हे शिकायला आयुष्य वेचावे लागते.
- दुस-याला कसे हारवता येईल यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला कसे जिकवता येईल यासाठी प्रयत्न करावा.
- कुत्र्यांना दगड मारायला बुध्दी लागत नाही, बुध्दी लागते त्याला भाकरी घालायला.
- स्वतःला अभ्यासात गुंतवले की कोण काय बोलते तिकडे लक्ष द्यायला वेळ मिव्ठत नाही..
- सुंदर विचार असलेली माणसं वयाने वृध्द झाली तरी त्यांचे सौदर्य कमी होत नाही.
- कार्य स्वतः करायचे परंतु यशात सहभागी सर्वाना करायचे ही मोठया माणसाची कामाची पध्टत असते.
- खुप प्रशंसा केली म्हणून गर्व करतांना प्रशंसा करणा-यांचा दर्जा काय हे ही लक्षात घेतले पाहीजे.
- माणूस विचार करुन बोलला की नंतर विचार करायाची वेव्ठ येत नाही .
- टाईमपास हा शब्दच आयुष्यातुन डीलीट करा कारण आयुष्यात वेळ खुप कमी आहे,आणि करायचे भरपुर आहे.
।। गुरुवर्य श्री.विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या प्रासादिक कीर्तनातील कल्याकारी वचने।।
- कीत्येक जण म्हणतात माणसाने प्रयत्न केले तर तो संत होवु शकतो, काही म्हणतात ता इश्वर होवु शकतो,पण मला वाटते संत आणि देव होणे तितके सोपे नाही, त्यापेक्षा आगोदर प्रत्येकाने माणुस आणि माणसासारखे वागावे.
- दगड एकदा मंदीरात गेला तर त्याचा देव झाला, माणस दररोज मंदिरात जातात तरी ही दगडापेक्षा कठीण वागतात.
- दगडातला नको असलेला भाग काढुन आवश्यक तो भाग ठेवला की त्याची सुंदर सुबक मुर्ती बनते आणि मंदिरात त्याची पुजा केली जाते, तसे माणसांनी आपल्यातले नको असलेले अवगुण काढले आणि आवश्यक ते गुण ठेवले तर माणुस संपुर्ण जगात पुज्य होवू शकतो.
- रोग लपवला की शरीराचा नाश, आणि अज्ञान लपवले की आयुष्याचा नाश म्हणून वैद्यासमोर रोग अणि ज्ञानी पुरूषासमोर अज्ञान प्रगट करावे.
- विनाकारण जळणे तसे वाईटच आहे, कारण जळण्यासाठी आगोदर पेटावे लागते,आणि जो पेटला राख त्याची स्वत:चीच होते.
- पुस्तक वाचुन माणुस ज्ञानी होईल हे खरे आहे, पण अनुभव येण्याकरीता गुरू करावाच लागतो.
- भक्तीच्या अंकुराला वासना नावाची बकरी वाढू देत नाही, म्हणून त्या अंकुराला वाढण्यासाठी सद्विचाराचे कुंपन घालुन त्याला सत्संगाचे पाणी घातले की भक्तीचा वृक्ष मोठा होवुन त्याला फळे येतात.
- माणसांनी स्वत:ला सतत काहीतरी चांगले करण्यात गुंतवले की त्याला त्याच्या विषयी कोण काय बोलतो तिकडे लक्ष द्यायला आणि कोणाविषयी काही बोलायला वेळच मिळणार नाही.
- वासनेला प्रेमाचे नाव देणे म्हणजे ख-या प्रेमाचा अपमान करणे.
- ज्या व्यक्तीकडुन चांगले शिकायला मिळते त्याचे वय,जात,आणि देश पाहु नका.
- मुक्काम ठरवून केलेला प्रवास आणि ध्येय ठरवून केलेले कर्म कधीच वाया जात नाहीत.